बनावट कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन

पुणे,  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या पुणे विभागातील कर्मचाऱ्यांच्या नावे खोटे कॉल करून आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पीएफ कार्यालयातर्फे बोनस दिला जाणार असून त्यासाठी सदस्यांनी पैसे जमा करावे, असे खोटे आमिष दुरध्वनीद्वारे दिले जात आहे. मात्र, असे कोणतेही कॉल कार्यालयातर्फे केले जात नाहीत. अशा खोट्या कॉल्सना भुलून सदस्यांनी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन आयुक्त अरुण कुमार यांनी केले आहे.
यासंदर्भात पीएफ कार्यालयाच्या पुणे विभागाचे आयुक्त अरुण कुमार यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. पीएफ कार्यालयाद्वारे सदस्यांना असे कोणतेही कॉल केले जात नाहीत. त्यामुळे खोट्या कॉलद्वारे दिल्या जाणाऱ्या ऑफर्सना भुलून सदस्यांनी आपली माहिती देऊ नये. पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावे नागरिकांना खोटे कॉल केले जात आहेत. त्यामध्ये पीएफ कार्यालयाच्या तक्रार निवारण कक्षाचे कर्मचारी बोलत असल्याचे सांगत, पीएफ कार्यालयातर्फे बोनस दिला जाणार असून त्यासाठी सदस्यांनी पैसे जमा करावे, असे खोटे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)