बनावट कागदपत्रे सादर करुन बॅंकेची 28 लाखाची फसवणूक

बनावट कागदपत्रे सादर करुन बॅंकेची 28 लाखाची फसवणूक
पुणे,दि.24(प्रतिनिधी)-बनावट कागदपत्रे सादर करुन बॅंकेची 28 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका दांम्पत्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतात.
ईश्‍वर गोविंद वाघमारे व त्याची पत्नी ( रा.शिवचैतन्य कॉलनी, शेवाळवाडी, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कोंढवा शाखेच्या ब्रॅंच मॅनेजर नितर भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी दांम्पत्यांनी कोंढवा येथील वसुंधरा डेव्हलपर्स यांच्या वसुंधरा वैभव नावाच्या साईटमध्ये 302 नंबरची सदनिका खरेदी करण्यासाठी कर्जाचा प्रस्ताव दिला होता. हे कर्ज प्रकरण सादर करताना भारत फोर्ज कंपनीचे अपॉईनमेंट लेटर, सॅलरी स्लीप, आयटी रिटर्न, फॉर्म 16 ईश्‍वर वाघमारे यांनी दिले तर पत्नीच्या नावाने विशाल इंजिनिअरींग इंडिया कंपनीची सॅलरी स्पिल, वसुंधरा डेव्हलपर्सचे डिमांड लेटर, पैसे भरल्याच्या पावत्या तसेच सदनिका कर्जाऊ ठेवण्यासाठी दिलेली एनओसी अशी सर्व बनावट कागदपत्रे बॅंकेत सादर केली. तसेच वसुंधरा डेव्हलपर्सच्या नावाने लुल्लानगर येथील बॅंकेत बनावट खाते उघडले. यानंतर कर्जाची 28 लाखाची जमा झालेली रक्कम काढून घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.जी.लोखंडे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले इतकी सारी कागदपत्रे सादर केल्यावर त्याची विश्वासहर्ता बँके कडून तपासली न जाणे म्हणजे डाळ म्ये कुछ काळा हाये असेच म्हणावे लागेल तेव्हा आता सर्वच ब्यांकांच्या अधिकाऱयांची सखोल चवकशी होणे गरजेचे वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)