बनावट कागदपत्राद्वारे सिमकार्ड घेणाऱ्या आणखी एकास अटक

पुणे – बनावट कागदपत्राव्दारे आयडीया कंपनीची 159 सिमकार्ड घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आणखी एकास अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शोएब बाबा शेख (20, रा. साईबाबा मंदिराजवळ, शिवाजीनगर) असे कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी यापूर्वी मोहसीन सलीम पठाण (19, रा. शिवनेरी नगर, कोंढवा) आणि हर्षल राजेंद्र मुथा (30, रा. वर्धमान नगर, कोंढवा) यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. निलेश तापकीर (30, रा. नाना पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीपासून हा प्रकार सुरू होता. फियार्दीचे चंदननगर येथे एंजल कम्युनिकेशन नावाने दुकान आहे. आरोपींनी त्यामधून एस. के. टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स या फर्मच्या नावाने खोटी कागदपत्रे देऊन आयडीया कंपनीची 159 सिम व कमीशनचे 47 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. यामुळे सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)