बनावट कागदपत्रप्रकरणी तलाठ्यासह तिघांवर गुन्हा

गोंदवले, दि. 1 (वार्ताहर) – सातबारा उताऱ्यात मिळकतदाराच्या परस्पर फेरफार केल्याप्रकरणी दहिवडी येथील तलाठ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद समर्थ गुंडगे यांनी दहिवडी पोलीस दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे, आमच्या नावावरील सातबारा उताऱ्यात तलाठी हिराचंद कोल्हे यांनी परस्पर फेरफार करून आमची फसवणूक केली आहे. अन्य हिस्सेदाराच्या नावावर पत्र्याचे शेड नसताना व त्याची नोंद करण्याचा अधिकार नसताना त्या जागेत शेड असल्याचा खोटा दाखला दिला आहे. त्या शेडची नगरपंचायत भूमिअभिलेख खात्यात नोंद नाही, असेही गुंडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, खोटी कागदपत्रे तयार करणे फसवणूक करणे याबाबत तलाठी कोल्हे यांना महसूल खात्यामधून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, यासंदभात महसूल मंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याचे गुंडगे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)