बनावट कंपन्यांविरोधात होणार कडक कारवाई

नवी दिल्ली – सेबीने भांडवली बाजारात सुधारणा करण्यासाठी पावले उचलली आहेत. कोटक समितीकडून सादर करण्यात आलेल्या 80 शिफारशींपैकी 40 प्रस्ताव कोणताही बदल न करता स्वीकारण्यात आले आहेत. 15 शिफारशींमध्ये काही बदल करत स्वीकारण्यात आले आहेत.

त्या आधारावर बनावट कंपन्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे संकेत देण्यात आले आहेत. शेअर बाजाराच्या नियमानुसार नॉन कम्पालयन्सवर प्रवर्तकांचे समभाग जप्त करण्यात येतील. दिवाळखोर कंपन्यांबद्दल सार्वजनिक मत मागविण्यात येईल, असे सेबी मंडळाच्या बैठकीनंतर अध्यक्ष अजय त्यागी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये दिवाळखोरीचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांमध्ये वाढ झाली. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लहान गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले.

आता गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे स्वस्त होणार आहे. सेबी मंडळाने म्युच्युअल फंडवरील एक्‍झिट लोडमध्ये 0.15 टक्‍क्‍यांनी कपात करण्यास मंजुरी दिली. यामुळे लवकरच म्युच्युअल फंडवरील एक्‍झिट लोड 0.20 टक्‍क्‍यांवरून 0.05 वर पोहोचेल. भांडवली बाजारातील डेटा मोफतपणे उपलब्ध करण्यात येईल. अल्गो ऑडर्सवर ऑर्डर टू टेड रेशो 0.75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. फ्युचर, ऑप्शन संदर्भातील नियमांतही बदल करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)