बनावट कंपन्यांविरोधात होणार कारवाई

नवी दिल्ली -बाजार नियामक सेबीने भांडवली बाजारात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. कोटक समितीकडून सादर करण्यात आलेल्या 80 शिफारशींपैकी 40 प्रस्ताव कोणताही बदल न करता स्वीकारण्यात आले आहेत. 15 शिफारशींमध्ये काही बदल स्वीकारण्यात आले आहेत. सेबी मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

बनावट कंपन्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे संकेत देण्यात आले आहेत. शेअरबाजाराच्या नियमानुसार नॉन कम्पालयन्सवर प्रवर्तकांचे समभाग जप्त करण्यात येतील. दिवाळखोर कंपन्यांबद्दल सार्वजनिक मत मागविण्यात येईल, असे सेबी मंडळाच्या बैठकीनंतर अध्यक्ष अजय त्यागी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये दिवाळखोरीचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांमध्ये वाढ झाली. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लहान गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)