बद्रीनाथमध्ये 42 यात्रेकरू अडकले 

भुवनेश्‍वर: उत्तराखंडमधील बद्रीनाथच्या यात्रेला गेलेले 42 यात्रेकरू खराब हवामानामुळे अडकून पडले असल्याचे आढळून आले आहे. हे सर्व यात्रेकरू ओडिशामधील गंजम जिल्ह्यातील आहेत. तुफान बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यामुळे परतीच्या वाटेवर असलेले हे यात्रेकरू अन्नपाण्यावाचून वाटेतील यात्रेकरूंच्या निवासामध्येच अडकून पडले आहेत, असे मदतकार्या विभागाचे सहआयुक्‍त पी.आर. मोहापात्रा यांनी सांगितले. उत्तराखंड सरकारला या यात्रेकरूंबाबत माहिती कळवण्यात आली असून आवश्‍यक ती मदत उपलब्ध करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

एका यात्रेकरूने शनिवारी रात्री फोनवरून कळवल्यानंतर यासंदर्भातील माहिती मिळाली. या भागात वीजपुरवठा खंडीत होत असल्याने मदतीसाठी संपर्क करणेही अवघड झाले आहे. तसेच बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाले असल्याचेही मोहापात्रा यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)