“बद्रिनाथ की दुल्हनिया’ 100 कोटींच्या जवळ

“बद्रिनाथ की दुल्हनिया’ रिलीज होऊन दोन आठवडे झाले आहेत. आतापर्यंत सिनेमाने सुमारे जेवढा गल्ला कमावला आहे. त्याची आकडेवारी पाहता लवकरच 100 कोटींचा टप्पा ओलांडला जाईल, असे वाटायला लागले आहे. “बद्रि…’च्या रिलीजच्याच दिवशी 12 कोटींचा धंदा झाला होता. तेंव्हापासून वरुण धवन आणि आलिया भट्टच्या या रोमॅंटिक कॉमेडीला प्रेक्षकांनी चक्‍क उचलून घेतले आहे. होळीच्या काळात अचानक “बद्रिनाथ…’च्या कमाईचा वेग मंदावला होता. मात्र थोड्या मंदगतीने का होईना सिनेमाने प्रेक्षकांना आपल्याकडे खेचणे सुरूच ठेवले आहे. विशेषतः या शनिवार रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पब्लिकने “बद्रिनाथ की दुल्हनिया’ बघणेच पसंत केले होते. या शुक्रवारी विक्रमादित्य मोटवानीचा “ट्रॅप्ड’ आणि रजत कपूरचा “मंत्रा’ रिलीज झाला. त्यामुळे “बद्रि…’चे आकर्षण कमी होईल, असा मार्केट निरीक्षकांचा अंदाज चुकला. आतापर्यंत “बद्रि…’ने 83.77 कोटींचा धंदा केला आहे. त्यामुळे 100 कोटींचा धंदा करण्यास विशेष अडचण भासणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)