बदेवाडीजवळ वीज खांबावर ट्रक धडकला

भुईंज – सातारा-पुणे महामार्गा वरील बदेवाडी गावच्या हद्दीत सेवारस्त्याकडे जाणाऱ्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने मालट्रक रस्त्या कडेचे गटाराचे चेंबर तोडून वीज खांबावर जावून आदळला. अपघातात वीज पोल जमिनदोस्त झाला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी, पुणे-सातारा महामार्गा वरील बदेवाडी गावच्या हद्दीत उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. त्यावरील वाहतुकही सेवा रस्त्याकडे वळविण्यात आली आहे. त्या वळणावर पुण्याकडून सातारकडे जाणारा मालट्रक (एमएच 09 सीए 440) दुपारी भरघाव वेगात येत होता. या वळणा चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याकडेला गटाराचे पाणी जाण्यासाठी बांधलेले चेंबर तोडून पुढील वीज खांबावर जावून तो आदळला. यामध्ये वीज खांब जमीन दोस्त झाला. हा मालट्रक पुढे शेतात जाऊन थांबला. सुदैवाने मालट्रकच्या मागेपुढे कोणतेही वाहन नसल्याने जीवित हानी झाली नाही. अपघाताची नोंद भुईंज पोलिसांत झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)