बदल्यांसाठी अवघ्या 120 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अर्ज

पिपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मागविलेल्या बदलीच्या प्रस्तावाला ठंडा प्रतिसाद मिळाला आहे. बदल्यांसाठी एकूण 120 कर्मचाऱ्यांचे अर्ज प्रशासन विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये गट अच्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र ठरणारे तसेच वैयक्‍तिक व वैद्यकीय कारणास्त बदली हवी असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पाठविण्याचे परिपत्रक प्रशासन विभागाने 22 जानेवारी रोजी काढले आहे. यामध्ये गट अ ते क मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 31 जानेवारीपर्यंत बदलीस पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार गट अ मधील एका अधिकाऱ्याने बदलीसाठी अर्ज सादर केला आहे. तर गट ब मधील तीन आणि क मधील 102 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गट ड मधील 16 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सर्व विभाग प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या या सर्व अर्जांची तपासणी करून बदलीस पात्र ठरणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची अन्य विभागांत बदली केली जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)