बदल्यांची संगीत खुर्ची पुरंदर

-तालुका वार्तापत्र
-निलेश जगताप

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचे हे पुरंदरकरांना कोडेच बनले आहे. तालुक्‍यातील महसुल, पोलीस, महावितरण, वनविभाग व अन्य कोणत्याही सरकारी अस्थापनेतील अधिकारी एक ते दोन वर्षांपेक्षा अधिक काळ पुरंदरमध्ये टिकत नाहीत. त्यामुळे एखादा नवीन अधिकारी तालुक्‍यातील कोणत्याही खात्यात आल्यानंतर तो स्थिरस्थावर होण्याआधीच त्यांची बदली होत आहे. परिणामी तालुक्‍यातील महत्त्वाचे निर्णय, शासकीय योजनांची अंमलबजावणी, शासकीय निधीचा योग्य विनियोग या गोष्टीत खूप मोठी दफ्तर दिरंगाई सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बहुतांश प्रशासकीय अधिकारी नियुक्ती होताना एकतर परिक्षाविधीन आणि पदोन्नती साठीच नियुक्ती झालेले असतात. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर लगेच त्यांना बदलीचे वेध लागलेले असतात. जवळजवळ सर्वच अधिकारी तालुक्‍याबाहेरील असल्यामुळे त्यांची तालुक्‍याशी कुठल्याही प्रकारची नाळ जोडलेली नसते. आज अनेक नागरिकांचे महसुली कामे खोळंबली आहेत. पुरंदरचे आधीचे तहसीलदार सचिन गिरी हे मनपसंत ठिकाणी बदलीच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या काही महिन्यात महसुली विभागाच्या प्रलंबित दाव्यांच्या सुनावण्या रखडलेल्या होत्या.

अजूनही प्रलंबित प्रकरणांच्या सुनावणी पूर्वपदावर आलेल्या नाहीत. नवीन तहसीलदार आता कुठे स्थिरस्थावर होत असताना प्रांताधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा रंगू लागली आहे. जर त्यांचीही बदली झाल्यास नगरिकांच्या अडचणीत भर पडणार हे मात्र नक्‍की. तालुक्‍यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. तरीही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)