बदली प्रक्रियेतील त्या शिक्षकांची वेतनवाढ रोखणार

जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांची माहिती
सातारा,दि.11 प्रतिनिधी- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांनी बदली प्रक्रियेत घोळ घातल्याप्रकरणी संबधित शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांचा खुलासा अयोग्य आला तर त्यांची एक वेतनवाढ रोखण्यात येणार येईल, अशी माहिती जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले, जे शिक्षक बदलीस पात्र नसताना अर्ज सादर केले अशा 15 शिक्षकांना मुळ जागी नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. तर ज्या शिक्षकांनी बदलीसाठी बनावट अपंगत्वाचे दाखले सादर केले आहेत. त्यांची चौकशी सुरू असून नजीकच्या काळात त्यांचा निर्णय निश्‍चितपणे होईल, असे सांगून शिंदे म्हणाले, शिक्षकांच्या हाती भावी पिढी घडविण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे. मात्र, काही शिक्षक त्या कार्याकडे उपजिविकेचे साधन म्हणून पहात आहेत. ही बाब चिंताजनक आहे. तर नुकतेच पाटण तालुक्‍यातील एका शाळेत बदली शिक्षकाची नेमणूक करणाऱ्या संबधित शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. असे शिंदे यांनी सांगितले. तर माण तालुक्‍यात टॅंकरच्या खेपा वाढविण्यासाठी जीपीएस प्रणालीचा दुरूपयोग असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपाची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत संबधित गावच्या सरपंचानी नियमित टॅंकरच्या खेपा होत असल्याचे लिहून दिले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)