बदलत्या हवामानामुळे पिकांवर प्रादुर्भाव

चिंबळी-पुणे जिल्हा ग्रामिण भागात खेड तालुक्‍यात विविध परिसरातील शेतकरी वर्ग दरवर्षी उत्पादित मालाला बाजारभाव मिळेल या आशेने शेतमाल पिकवत असतो; परंतु निसर्गाच्या लहरी हवामानाचा मोठा फटका सध्या शेतकरी वर्गांला बसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सतत हवामानात बद्दल होत असल्यामुळे दाट धुके, ढगाळ हवामान यामुळे तीन ते चार दिवसांत पिके सुकू लागली आहेत, तर काही प्रमाणात पिवळी पडली आहेत. कांदा, बटाटा यावर किती औषध फवारणी करायच्या व त्यासाठी पैसा तरी कुठून आणायचा याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे. मागील वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला होता. यावर्षी पाऊस कमी असूनही गावरान कांदा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आला. या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र वाढल्याने शेतीकामासाठी शेतमजुरांची टंचाई जाणवत असल्याने शेतमजूर भोसरी, चाकण, आळंदी येथील मजूर अड्ड्यावर जाऊन शेतमजूर आणावे लागत आहेत; त्यांना मजुरी देण्यावरून शेतकऱ्यांची चढाओढ सुरू असते. दरम्यान कांदा व बटाटा पिकासाठी दोन ते तीन महिन्यांत वेळोवेळी औषध फवारणी करावी लागत आहे. तीन चार वेळा रासायनिक खते टाकावे लागतात व तीन ते चार वेळा शेतात उगवलेले तण काढावे लागते. त्यातच वारंवार वीज पुरपठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असल्याने पिकांना पाणी देणे मुश्‍कील झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)