बदलत्या काळानुसार काम करा – पंतप्रधान

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. बदलत्या काळानुसार आपल्याला आपल्या कार्यपद्धतीत देखील बदल करायला हवा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटले आहे. नवी दिल्लीतील नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशासनात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

मोदींनी यावेळी इलेक्‍ट्रॉनिक मीडियाचे महत्त्व अधोरेखित केले. ई-गव्हर्नन्स, एम-गव्हर्नन्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे अधिकाधिक सोपे आहे. यामुळे सोयी-सुविधांचे लाभ लोकांपर्यंत सुलभतेने पोहोचवता येतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)