बदलते तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोरील आव्हान – बिपिन रावत

एनडीएचा दीक्षांत सोहळा दिमाखात

पुणे : सैन्यदलाच्या बॅण्डच्या तालावर अतिशय शिस्तबद्ध आणि शानदार संचलन करत, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 135 व्या तुकडीने सैन्य दलाच्या सेवेत रूजू होण्यासाठी प्रबोधिनीतील अंतिम पग ओलांडले. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी सर्त्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेसिडेंड मेडलने गौरविण्यात आले. तुमच्यातील नैतिकता कायम जपा, असा संदेश यावेळी लष्करप्रमुखांनी विद्यार्थ्यांना दिला.

-Ads-

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 135 व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन समारोह शुक्रवारी उत्साहात पार पडला. यंदा प्रबोधिनीतून 261 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत. यामध्ये लष्करातील 186, नौदलतील 21 आणि हवाई दलातील 54 विद्यार्थी आहेत. याव्यतिरिक्त अफगानिस्तान, भूतान, किझगिस्तान, टांझानिया, लेसोथो, तझाकिस्तान, मोरिशस, व्हिएतनाम आणि श्रीलंका या मित्र राष्ट्रांतील 16 विद्यार्थ्यांचाही यामध्ये समावेश आहे. याप्रसंगी प्रबोधिनीतील सर्वोत्तम कामगिरीसाठी दिला जाणारा प्रेसीडेन्ट गोल्ड मेडल कॅप्टन जयप्रीत सिंग याला लष्करप्रमुख जनलरल रावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच परिमर पारासार याला प्रेसीडेन्ट’स सिल्व्हर मेडलने तर स्वप्निल गुप्ता याला प्रेसीडेन्ट ब्रॉन्झ मेडल’ने सन्मानित करण्यात आले.

यावेळी रावत म्हणाले, “अतिशय खडतर प्रशिक्षण घेत तुम्ही हे प्रशिक्षण पूर्ण केलेत, त्यासाठी या विद्यार्थ्यांचा मला अभिमान वाटतो. आगामी काळात बदलते तंत्रज्ञान हे या विद्यार्थ्यांसमोरील एक मोठे आव्हान असणार आहे. त्यातूनच युद्धाचे स्वरूपही बदलत आहे. अशा बदलणाऱ्या काळात स्वत:तील कौशल्यांना समृद्ध करत विद्यार्थ्यांनी सर्वोच्च यश मिळवावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. विद्यार्थ्यांनी उंच उडण्याचे स्वप्न पहावे, अशक्‍य ते शक्‍यात उतरविण्याची जिद्द बाळगावी आणि पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न करावे. मात्र हे सर्व करतानाच तुम्हाला आपल्या सहकाऱ्यांनाही सोबत घेऊन चालायचे आहे. त्यामुळेच तुमच्यातील नैतिकता कायम जपा, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)