बदलती जीवनशैली, बदलता विमा (भाग-१)

शहरी जीवनशैली आणि आहाराच्या बदललेल्या सवयींमुळे अनेक नवे आजार पाय पसरत आहेत. त्यांच्यावर उपचार करणे महागडे असल्याने सामान्य माणूस ते करू शकत नाही. लोकांची ही समस्या लक्षात घेऊन इर्डाने या आजारांना पर्यायी यादीतून काढून मुख्य जोखमीमध्ये सामील करण्याचे निर्देश विमा कंपन्याना दिले आहेत. या निर्देशांनुसार दातांच्या आजारांसमवेत इतरही काही आजारांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे.

कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी घेतल्यास त्यात अनेक आजारांना संरक्षण दिले जाणार आहे. पण काही आजार हे पर्यायी यादीमध्ये सामील केले आहेत. त्यांना मूळ पॉलिसीत स्थान दिलेले नाही. त्यामुळे विमा कंपन्या या पर्यायी यादीमध्ये असलेल्या आजारांना संरक्षण प्रदान करत नाही. पर्यायी यादीतील काही आजारांनाही संरक्षण मिळवू इच्छित असाल तर थोडा अधिक प्रीमियम द्यावा लागतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बदलती जीवनशैली, बदलता विमा (भाग-२)

मात्र भविष्यात पर्यायी आजारांच्या यादीतील बहुतेक आजार मूळ आरोग्य विम्यामध्ये सामील करता येतील. त्यासाठी विमा नियामंक मंडळ इर्डा ने नुकतेच काही निर्देश जारी केले आहे. त्यात असे म्हटले आहे की पर्यायी यादीतील विकारांनाही विमा कंपन्यांनी आपल्या विमा संरक्षण योजेनेत सामील करावे. इर्डा ने दिलेल्या या निर्देशानुसार आता विमा कंपन्या त्यांच्या पॉलिसी नव्याने तयार करताहेत. लवकरच बाजारात सर्वच आजारांना विमा संरक्षण देऊ करणारी पॉलिसी येईल.

– राकेश माने 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)