बदनामीची ओळख पुसण्यासाठी एकरूप व्हा

जिल्हाधिकारी नवल किशोर राम : पेरणे फाटा येथे बैठक

कोरेगाव भीमा- मागील वर्षी कोरेगाव भीमा, सणसवाडी भागात झालेल्या घटनेमुळे आपली बदनामी झाली आहे. ही ओळख पुसण्यासाठी समाज एकरुप ठेऊन सर्वतोपरी काळजी घेऊन शांतता व सलोखा ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजय रणस्तंभ भूमीत एक जानेवारी रोजी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रम तयारीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संदीप पखाले, विलास गरुड, प्रांतधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, रामभाऊ दाभाडे, सुभाष जगताप, ज्ञानेश्‍वर वाळके, संजीवनी कापरे, उत्तमराव भोंडवे, सुदाम पवार, सर्जेराव वाघमारे, काळूराम गायकवाड, लताताई शिरसाठ, सागर गायकवाड, काळुराम गायकवाड, रवींद्र कंद, सरपंच रुपेश ठोंबरे, उपसरपंच अनिता सात्रस आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले की, दंगल झाल्यानंतर गरीबाचे तसेच मध्यमवर्गीयांचे प्रचंड नुकसान होते. परिसरातील प्रतिमा बदनाम होते. समाज एकरुप रहात नाही. आणि उद्योग व्यवसायावर परिणाम होतो. म्हणून आपल्यालाही परिस्थिती बदलायची आहे. प्रशासनास कुठलीही जात धर्म नसतो. कर्तव्ये महत्त्वाची असतात. स्थानिक नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवा. कायदा, सुव्यवस्था ठेवण्यात प्रशासन दक्ष आहे. संवाद ठेवा. चुकीच्या गोष्टींना थारा देऊ नका. आपण सर्वानी मिळून जबाबदाऱ्या घेऊन शांतता सलोखा ठेऊन कार्यक्रम यशस्वी करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले की, पोलीस प्रशासन सर्व काळजी घेत आहे. वाहतूक, पिण्याच्या पाणी, वाहनतळ, स्वच्छतागृह आदींचा सर्व बाजुने विचार केलेला आहे. कार्यक्रम यशस्वी व शांतपणे पार पाडणार आहे. सहायक निरीक्षक विकास बडवे यांनी सूत्रसंचालन केले. लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी आभार मानले.

  • विजय स्तंभ परिसरात कायमस्वरूपी पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते, वाहनतळ, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, पथदिवे, सीसीटीव्ही आदी सुविधासह पुरेसा चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. कार्यक्रम निश्‍चित यशस्वी होईल.
    – नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी पुणे.
  • यावर्षी एक जानेवारी रोजी येणाऱ्या सर्व बांधवाचे ग्रामस्थ सकारात्मक विचाराने स्वागत करतील. पाण्याची बाटली व गुलाबपुष्प देण्यात येईल. पोलीस यंत्रणेला पूर्ण सहकार्य राहिल.
    – प्रदीप कंद, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)