बदकांमुळे पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढते – बिप्लव देव

त्रिपुरा – ग्रामीण भागातील जनतेने बदकं पाळण्याला प्राधान्य द्यायला हवे. बदके ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भुमिका बजाऊ शकतात. त्यामुळे बदकांच्या पुरवठा करण्याचा आपला मानस असल्याचे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, बदके पाण्यात पोहल्याने पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण आपोआप वाढते, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. यापूर्वीही त्यांनी असे विधान केले होते.

त्रिपुरातील रुद्रसागर येथे एका पारंपारिक बोट रेसच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथे नीर महाल नामक एका मोठ्या वाड्याभोवती कृत्रित तलाव निर्माण करण्यात आला आहे. या तलावाच्या भोवती राहणाऱ्या मासेमारांना बदकांची 50 हजार पिल्ले देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण त्रिपुरामधील ग्रामीण भागात पांढऱ्या रंगांच्या बदकांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रामुख्याने पर्यटनस्थळांच्या ठिकाणी ही बदके वितरीत केली जातील त्यामुळे अशा तलावांचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहिल तसेच त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदाही होईल, असे देव यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देव म्हणाले, जेव्हा बदके पाण्यामध्ये पोहतात तेव्हा ऑक्‍सिजनची पातळी आपोआप वाढते. त्यामुळे पाण्यातील माशांना जास्त ऑक्‍सिजन मिळतो. त्याचबरोबर पक्षांची विष्ठाही ते खात असल्याने पाणी स्वच्छ राहते. त्याचा उपयोग माशांच्या वेगाने वाढीला होतो. हे पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने होते, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)