बडोदा, मुंबई, कर्नाटक यांचे चमकदार विजय

विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

बंगळुरू – बडोदा, मुंबई आणि कर्नाटक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर चमकदार विजयाची नोंद करताना येथे सुरू असलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.

-Ads-

चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या एलिट अ गटातील लढतीत बडोदा संघाने सर्वांगीण सरस खेळ करताना रेल्वे संघाचा 180 धावांनी धुव्वा उढविला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना बडोदा संघाने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 269 धावांची मजल मारली. त्यानंतर बडोद्याच्या गोलंदाजांनी रेल्वे संघाचा डाव 89 धावांत गुंडाळून आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. मनीष रावने नाबाद 23, तर सौरभ वाकसकरने 17 धावा करताना झुंज दिली.

बाबाशफी पठाणने केवळ 25 धावांत 5 बळी घेताना रेल्वेच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. लुकमन मेरीवालाने 14 धावांत 2 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. त्याआधी आदित्य वाघमोडे (74) आणि केदार देवधर (44) यांनी बडोदा संघाला 88 धावांची दमदार सलामी दिली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला कृणाल पांड्या (62) आणि आणि कर्णधार दीपक हूडा (54) यांनी बडोद्याला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. रेल्वे संघाकडून मनीष रावने 30 धावांत 3 बळी घेतले.

आलुर येथे पार पडलेल्या आणखी एका एलिट अ गट लढतीत श्रेयस गोपाल व के. गौतम या फिरकी गोलंदाजांनी कर्नाटक संघाला विदर्भावर 6 गडी राखून विजय मिळवून दिला. या दोघांनीही 3-3 बळी घेत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या विदर्भाचा डाव 36.2 षटकांत सर्वबाद 125 धावांवर गुंडाळला.गणेश सतीशने 50, तर अथर्व तायडेने 32 धावा करीत कडवी झुंज दिली. त्यानंतर कौनेन अब्बास (नाबाद 35) आणि श्रेयस गोपाल (नाबाद 34) यांच्या भागीदारीमुळे कर्नाटकने 32.3 षटकांत 4 बाद 129 धावा करताना चमकदार विजयाची नोंद केली. विदर्भाकडून यश ठाकूरने 22 धावांत 3 बळी घेतले.

तिसऱ्या अ गटसाखळी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हिमाचल प्रदेश संघाने मुंबईविरुद्ध निर्धारित 50 षटकांत 6 बाद 269 धावांची मजल मारली. प्रशांत चोप्राने 86, तर ऋषी धवनने नाबाद 53 धावांचे योगदान दिले. तर मुंबईकडून शिवम दुबेने 2 बळी घेतले. त्यानंतर सूर्यकुमार यादवचे शानदार नाबाद शतक आणि शम्स मुलानीने त्याला दिलेली साथ यामुळे मुंबईने 44.3 षटकांत 4 बाद 270 धावा फटकावून सहा गडी राखून विजय मिळविला. सूर्यकुमारने नाबाद 123 धावांची खेळी केली. हिमाचल प्रदेश संघाकडून ऋषी धवनने 42 धावांत 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक-

1) बडोदा संघ- 50 षटकांत 9 बाद 269 (आदित्य वाघमोडे 74, केदार देवधर 44, कृणाल पांड्या 62, कर्णधार दीपक हूडा 54, मनीष राव 30-3) विजयी वि. रेल्वे संघ- 24 षटकांत सर्वबाद 89 (मनीष राव नाबाद 23, सौरभ वाकसकर 17, बाबाशफी पठाण 25-5, लुकमन मेरीवाला 14-2),

2) विदर्भ संघ- 36.2 षटकांत सर्वबाद 125 (सतीश गणेश 50, अथर्व तायडे 32, श्रेयस गोपाल 13-3) पराभूत विरुद्ध कर्नाटक संघ- 32.3 षटकांत 4 बाद 129 (कौनेन अब्बास नाबाद 35, श्रेयस गोपाल नाबाद 34, यश ठाकूर 22-3),

3) हिमाचल प्रदेश संघ- 50 षटकांत 6 बाद 269 (प्रशांत चोप्रा 86, ऋषी धवन नाबाद 53, शिवम दुबे 41-2) पराभूत विरुद्ध मुंबई संघ- 44.3 षटकांत 4 बाद 270 (सूर्यकुमार यादव नाबाद 123, शम्स मुलानी नाबाद 41, ऋषी धवन 42-2).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)