“बडीकॉप-अ फ्रेंड इन नीड’ फोरम उपक्रमाला ऍमवेचा पाठिंबा

पुणे -ऍमवे इंडिया या भारतातल्या सर्वांत मोठ्या डायरेक्‍ट सेलिंग एफएमसीजी कंपनीने पुणे पोलिसांच्या ‘बडीकॉप – अ फ्रेंड इन नीड’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी पुणे पोलिसांशी भागीदारी केली आहे. पुणेकर महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा खास उपाय योजण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत, प्रत्येक नोकरदार महिलेला संकटप्रसंगी मदत करण्यासाठी एक हक्‍काची व्यक्‍ती म्हणजेच तिचा ‘बडीकॉप मिळावा म्हणून, पुणे पोलीस प्रत्येक महिलेला तिच्यासाठी नेमण्यात आलेला एक खास संपर्क क्रमांक देणार आहेत.

या उपक्रमाच्या व भागीदारीच्या माध्यमातून, पुणेकर नोकरदार महिलांसाठी सुरक्षित व सोयीस्कर वातावरण निर्माण करणे हे ऍमवे इंडिया आणि पुणे पोलिसांचे ध्येय आहे. पुणे पोलिसांच्या बडी कॉप – अ फ्रेंड इन नीड’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भरभरून कौतुक केले असून राज्यातल्या अन्य मोठ्या शहरांतही हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना पुण्याच्या पोलीस आयुक्‍त श्रीमती रश्‍मी शुक्‍ला म्हणाल्या, ‘महिलांची सुरक्षा ही काळाची गरज बनली असून पोलिसांच्या सहकार्याने महिलांना आत्मविश्वास वाटेल असे सशक्‍त व सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. सुरक्षा हा केवळ दृष्टिकोन न राहता ते वास्तव म्हणून समोर आणणे हे माझे ध्येय असून हे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने हा उपाय म्हणजे पाया आहे. ऍमवेने आम्हाला सहाय्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. हा उपक्रम दीर्घकाळ चालेल.

महिला सुरक्षेच्या वाढत्या चिंतेबद्दल ऍमवे इंडियाच्या पश्‍चिम विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप प्रकाश म्हणाले, ‘स्मार्ट शहरात स्मार्ट सुरक्षाही असणे गरजेचे असते. पुण्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार महिलांची संख्या खूप मोठी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आखल्या जाणाऱ्या उपाययोजनाही तितक्‍याच महत्त्वाच्या ठरतात. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या पुणे पोलिसांच्या मोहिमेत त्यांना साथ देताना आम्हाला खरोखर फार आनंद होतो आहे.

ते पुढे म्हणाले, ‘महिलांची सुरक्षा आणि संरक्षण यात पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. एक जबाबदार कॉर्पोरेट कंपनी म्हणून, महिलांच्या सुरक्षेसाठी आखण्यात आलेल्या या क्रांतिकारी उपक्रमाला आम्ही यापुढेही सहाय्य करीत राहणार आहोत. पुणे पोलिसांतर्फे पुणे शहरात 2017 साली हा उपक्रम सादर करण्यात आला असून महिलांच्या कार्यक्षेत्रातील वातावरण सुरक्षित व सोयीस्कर बनवणे हा यामागचा हेतू होता.

महिलांना संकटकाळात किमान वेळेत पोलिसांची मदत मिळावी, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काही खास व्हॉट्‌सऍप समूह तयार करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत या समूहातील सदस्यांना किमान वेळेत पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येतो, त्यांना परिस्थितीबाबत माहिती देता येते. तसेच, केवळ एका बटणाच्या सहाय्याने आपले लोकेशनही पोलिसांसोबत शेअर करता येते. परिणामी, संकटकाळात त्वरित मदत मिळू शकते व वेळ फुकट जात नाही. या उपामाच्या सादरीकरणावेळी ऍमवेच्या 50 हून अधिक महिला थेट विोत्यांनी हजेरी लावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)