बटाटा, फळे आणि इंधनाचे दर वाढल्याने महागाईत ३.१८ टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१८ मध्ये भारतात घाऊक महागाईचा दर ३.१८ टक्के राहिला. तर मार्चमध्ये हा दर २.४७ टक्के होता. एप्रिलमध्ये प्राथमिक आणि जीवनावश्यक वस्तू, अन्नपदार्थ यांच्या महागाईचा दर ०.८७% नोंदवला गेला. तर मार्च महिन्यात हे प्रमाण ०.२९ टक्के ने घसरले होते. तर, एप्रिल महिन्यात डाळींचे भाव सुमारे २२.४६ टक्के ने घसरले आहेत.

असे असले, तरी मागील वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत एप्रिल २०१८ मध्ये बटाट्याच्या भावात सुमारे ६७.९४ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर फळांचे भाव १९.४७ टक्के आणि कांद्याचे भाव १३.६२ टक्के वाढले आहेत. तर सतत वाढत असलेल्या इंधन दरामुळे या महागाईत आणखी भर पडत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)