बटाटा पिकाला पावसाची गरज

मंचर- सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात बटाटा पिकाला अजूनही मोठ्या पावसाची गरज आहे. योग्य प्रमाणात पाऊस नसल्याने फुलोऱ्यात आलेले बटाटा पीक सुकू लागले आहे. पुढील काळात वेळेवर पाऊस झाला नाही, तर बटाटा उत्पादनात घट होईल, असा अंदाज शेतकरी बांधवांनी व्यक्त केला आहे.
सातगाव पठार परिसर हा बटाट्याचे आगर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बटाट्याची लागवड केली जाते. येथील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय बटाटा पीक असून भांडवली खर्च करून शेतकऱ्यांनी बटाट्याची लागवड केली आहे. मात्र, मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बटाटा पीक सुकू लागले आहे.ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, ते शेतकरी पिकाला पाणी देत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही, त्या शेतकऱ्यांची बटाटा पिके सुकू लागली आहेत, अशी माहिती बटाटा उत्पादक राम तोडकर आणि अशोक बाजारे यांनी दिली.
सध्या येथील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. ढगाळ वातावरणामुळे बटाटा पिकावर रोगराई पसरली आहे. बटाटा पिकाला महागडी औषध आणून फवारणी करण्याच्या कामात शेतकरी सध्या व्यस्त आहे. या परिसरातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असून चांगला पाऊस बटाट्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याने प्रगतशील शेतकरी जयसिंगराव एरंडे यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)