“बजाज सोसायटी’च्या निवडणुकीत समर्थ पॅनलचा धुव्वा

पिंपरी – निवडणूक खर्चाच्या तपशीलावरुन चर्चेत आलेली बजाज ऑटो एप्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक चुरशीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये समर्थ सहकार पॅनलला पराभवाची धूळ चारत विश्‍व कल्याण कामगार संघटना पुरस्कृत कै. रावसाहेब पोपटराव शिंदे पॅनलचे 9 उमेदवार बहुमताने निवडून आले.

औद्योगिक आणि सहकार क्षेत्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. पतसंस्थेच्या 11 जागांसाठी मतदान घेण्यात आले. 92.71 टक्के म्हणजेच 1451 सभासदांनी मतदान केले. पूर्वीचे परिवर्तन पॅनल म्हणजेच आत्ताचे समर्थ सहकार पॅनल कै. रावसाहेब पोपटराव शिंदे पॅनेलच्या विरोधात उभे ठाकले होते. परिवर्तन पॅनलचे नेतृत्व माजी नगरसेवक ईश्‍वर ठोंबरे तर कै. रावसाहेब पोपटराव शिंदे पॅनलचे नेतृत्व ज्येष्ठ कामगार नेते दिलीप पवार, सरचिटणीस बाळासाहेब थोरवे, उपाध्यक्ष प्रदीपकुमार खाडे यांनी केले. निवडणुकीत दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या. कै. रावसाहेब पोपटराव शिंदे पॅनलचे अंकुश कोल्हापुरे, जालिंदर खतकर, राधाकृष्ण माने, सुनील मिसाळ, सर्जेराव पाटील, पंकज पाटील, जयवंत कांबळे, संजय बेदरकर, तुषार टपले हे उमेदवार विजयी झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बजाज ऑटो एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर गेल्या पंधरा वर्षापासून कै. रावसाहेब शिंदे पॅनेलचे वर्चस्व आहे. मात्र, सोसायटीच्या संचालकांनी निवडणूक खर्चाचा तपशील न दिल्याचा आरोप करत विरोधी पूर्वीच्या परिवर्तन पॅनल मधील काही उमेदवार याविरोधात न्यायालयात गेले होते. न्यायालयाने शिंदे पॅनलच्या नऊ सदस्यांना अपात्र ठरवले. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली. मात्र, कामगारांनी पुन्हा एकदा कै. रावसाहेब शिंदे पॅनेललाच कौल दिला.

2004 पासून संस्थेवर प्रामाणिकपणे काम केलेल्या कामाची सभासदांनी भरभरून पावती दिली. गेली 14 वर्षे विश्‍व कल्याण कामगार संघटनेचे पॅनल सभासदांसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत आहे. प्रामाणिकपणाच्या प्रचंड ताकदीचा हा विजय आहे.
– दिलीप पवार, अध्यक्ष, विश्‍व कल्याण कामगार संघटना.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)