बजाजच्या कामगारांचे आदोलन

पिंपरी- वेतनवाढ करार मार्गी लावावा; तसेच निलंबित कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी बजाज कामगारांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे.

विश्व कल्याण कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि.29) पासून आकुर्डी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बजाज ऑटो कंपनीसमोरील शहीद दत्तात्रय पाडाळे यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येत आहे. बजाज ऑटो कंपनीच्या आकुर्डी व चाकण प्रकल्पातील कामगारांचा एप्रिल 2016 ते मार्च 2019 या कालावधीचा वेतनकरार रखडला आहे. याबाबत व्यवस्थापनासोबत कामगार संघटनेच्या अनेक बैठका होऊनही यावर तोडगा निघाला नाही.

दोन्ही प्रकल्पांतील वेतनकरार; तसेच 14 बडतर्फ कामगारांना कामावर परत घेण्याच्या मागणीसाठी औद्योगिक न्यायालयात दावे प्रलंबित आहेत. मात्र, व्यवस्थापन जाणीवपूर्वक हे दावे लांबवत असल्याच्या निषेधार्थ बेमुदत उपोषण सुरू करण्यात येत आहे, असे विश्व कल्याण कामगार संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब थोरवे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)