जकार्ता: 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्याच दिवशी 65 किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाने जपानच्या दाईची ताकातानी याला 10-8 असे पराभूत केले. या बरोबरच बजरंगने भारताला यंदाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. बजरंगने पहिल्याच लढतीत सुंदर खेळ केला.
खेळातील तांत्रिक गोष्टी त्याने घोटवून घेतल्या होत्या आणि तेच या सामन्यात पाहायला मिळाले त्यामुळे बजरंगने पिछाडी भरुन काढत उझबेगिस्तानच्या मल्लावर 13-3 अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश केला. आपल्या चतुर आणि आक्रमक खेळाने बजरंगने पहिल्या लढतीत विजय मिळवला.
तर उपान्त्य फेरीत बजरंगने मंगोलियाच्या प्रतिस्पर्ध्यावर 10-0 ने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बजरंगच्या या विजयासह एशियाड खेळांमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्‍चीत झालं होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)