बच्चन यांच्या बरोबरच्या कामाला विरोध झाला – गोविंदा

बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्यासाठी आपल्याला लोकांकडूनच विरोध झाला होता, असे गोविंदाने म्हटले आहे. “हम’मध्ये अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांनी एकत्र काम केले होते. तेव्हा तर ही भावाभावाची जोडी हिट झाली होती. त्यानंतर बच्चन यांच्याबरोबर “बडे मियां, छोटे मियां’मध्ये काम करण्याची संधी गोविंदाला मिळाली होती. पण त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याच्या प्रस्तावांना लोकांकडूनच विरोध व्हायला लागला होता.

लोकांनी आपल्याला तऱ्हेतऱ्हेने ही बाब समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. बच्चन सिनेसृष्टीचे महानायक आहेत. त्यांच्याभोवती मोठे वलय आहे. सिनेमामध्ये त्यांनाच जास्त महत्त्व दिले जाईल. त्यांच्यापुढे टिकाव लागणार नाही. बच्चन डेंजरस आहेत. ते कदाचित धोकाही देतील, असे सल्ले लोकांकडून दिले गेले होते. पण आपण मात्र कोणाचेही काहीही ऐकले नाही. “बडे मियां…’मध्ये दोघांनीही लाजवाब कॉमेडी केली होती. प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री खूपच आवडली होती. असे गोविंदाने अलीकडेच सांगितले.

बच्चन यांच्याशिवाय बॉलीवूडमधील तीन खान विरोधातही आपल्याला उभे करण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्याचा आपल्यावर खूप वाईट परिणाम झाला. पण या बॅड पॅचमधून बाहेर पडण्याचा प्रयत्नही आपण स्वतःच केला. आपल्या “बॅड पॅच’ला डेव्हिड धवन आणि सलमान खानबरोबर विनाकारण उद्‌भवलेले वाद कारणीभूत आहेत. डेव्हिड धवननी एका पार्टीमध्ये आपल्याबद्दल काही कॉमेंट केले. ते ऐकल्यावर त्यांच्याबरोबर काम न करण्याचा निर्णय आपण घेतला. तर महेश मांजरेकरच्या “शिक्षणाच्या आईचा घो’वर बेतलेल्या सिनेमाचे प्रपोजल सलमानने आपल्याकडे पाठवले होते. पण विषय न आवडल्याने आपण तो सिनेमा स्वीकारला नाही. सलमानला ही बाब आवडली नाही आणि त्याच्याबरोबर दुरावा निर्माण झाला, असे गोविंदाने सांगितले.

आपला न्यूमरोलॉजीवर अधिक विश्‍वास आहे, हे देखील त्याने आवर्जून सांगितले. आपण आपले नाव 1986 मध्ये गोविंदा आहुजा बदलून केवळ गोविंदा ठेवले. त्यानंतर “9′ आकड्याला अनुसरून बंगला, कार सगळ्याचा व्यवहार केला आणि त्याचे यश मिळाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)