बचत गट महिलांना सक्षम करणारी चळवळ

वडूज : येथे बचत गटातील महिलांना लाभांशाचे वाटप करताना एम. एस. गोडसे त्यावेळी यशोधरा पेठे, अनघा दानवे आदी महिला.

एम. एस. गोडसे : वडूजमध्ये गटातील महिलांना लाभांशाचे वाटप
वडूज, दि. 8 (प्रतिनिधी) – बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या स्वावलंबनाबरोबरच कौटुंबिक प्रगतीस चालना मिळण्यास मोठी मदत होत आहे. बचत गट चळवळ ही खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करणारी मोठी चळवळ असल्याचे जिल्हा बॅंकेचे सेवानिवृत्त विकास अधिकारी व विकास सोसायटीचे अध्यक्ष एम. एस. गोडसे यांनी सांगितले. येथील ब्रह्मचैतन्य महिला बचत गट, यशश्री महिला बचत गट, स्वामी समर्थ महिला बचत गटातील महिलांना लाभांशाचे वाटप व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
महिलांच्या अंगी असणारा काटकसरपणा लक्षात घेऊन बचत गट चळवळीला चालना मिळाली असल्याचे सांगून गोडसे म्हणाले, बचत गटाच्या माध्यमातून समाजातील सर्वच स्तरांतील महिलांना बचतीचे मोठे महत्व पटू लागले. त्यामुळे शहर परिसरात आज शेकडो बचत गट कार्यरत आहेत. या गटातील अनेक महिलांनी गटाच्या आर्थिक पाठबळावर लघु उद्योग सुरू करून स्वत:च्या कौटुंबिक प्रगतीस चालना दिली आहे. अनेक गटांतील महिला आज गटाच्या माध्यमातून तब्बल एक लाख रूपयांपर्यंत अल्पशा व्याजदराने कर्ज घेऊन स्वत:चा लघु व्यवसाय सुरू करीत आहेत. बचत गट चळवळ वाढविण्यास आणखी मोठ्या संधी आहेत. त्यासाठी महिलांनी एकत्र येऊन बचत गटांची स्थापना करावी. यशोधरा पेठे यांनी प्रास्ताविक केले. अनघा दानवे यांनी आभार मानले.
यावेळी सुहासिनी येवले, सुजाता सोहनी, नेहा भंडारे, अनुजा येवले, रेणुका शेटे, शोभा शेटे, सोनल शेटे, शीला शेटे, उज्वला येवले, मंजिरी गाडवे, वृषाली येवले, सुलोचना येवले, संजीवनी गाडवे, मोहिनी जोशी, पल्लवी उपाध्ये, सुमन लंगडे, ज्योत्सना येवले, सुनिता भंडारे, राधिका दानवे, वैशाली जोशी, रेखा गाडवे, रूपाली गाडवे, कांचन गाडवे, शैलजा घार्गे, शैलजा अंबिके, राजश्री शेटे, बायडाबाई गाडवे, हेमलता माने, अरूणा काळे, गौरी कुलकर्णी, संगिता कुलकर्णी, सुनंदा पवार, निर्मला जोशी, लिना देशपांडे, उर्मिला पवार, अनिता कुलकर्णी, अनिता पवार, कमल सुपनेकर, हेमा देशमाने, ज्योती जोशी, अनुप्रीता देशमाने, अपर्णा येवले, सुचेता म्हामणे, शैनाज शिकलगार, श्रावणी जोशी, सोनाली येवले, अलका बनसोडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)