पुणे – बचत गटात काम करू इच्छिणाऱ्या महिलांना इरसेड या संस्थेकडून कर्ज मिळून देतो, असे सांगत फॉर्म भरुन घेतले. फॉर्म फी म्हणून 5 व 10 हजार रुपये प्रमाणे या महिलांकडून पैसे घेतले. मात्र, त्यांच्याकडून घेतलेली रक्‍कम संस्थेत डिपॉझीट न करता संस्थेची तसेच महिलांची 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात संस्थेच्या चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात 110 महिलेंची फसवणूक झाल्याचे समोर आले असून हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. याबाबत संस्थेचे शाखाधिकारी प्रथमेश कुलकर्णी (26, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरसेड ही शासनाकडे रजिस्टर असलेली अधिकृत संस्था आहे. या संस्थेमार्फत बचत गट सुरु करु इच्छिणाऱ्या महिलांना कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. यासाठी संस्थेचे माणसे गावोगावी फिरुन महिलांचे गट तयार करतात. संस्थेत काम करणाऱ्या या चौघा कर्मचाऱ्यांनी पुणे तसेच परिसरातील काही महिलांना कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फॉर्म भरून घेतले.

यासाठी त्यांच्याकडून 5 ते 10 हजारांप्रमाणे पैसे घेतले. मात्र, त्यांच्याकडून घेतलेले पैसे संस्थेमध्ये डिपॉझिट न करता संस्थेची तसेच महिलांची फसवणूक केली. याप्रकरणी संस्थेचे शाखाधिकारी कुलकर्णी यांनी चौघा कर्मचाऱ्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या माध्यमातून 110 महिलांची फसवणूक झाल्याची नोंद आहे असून हा आकडा 150 पर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अहिवळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)