बचत गटामार्फत सोनखत निर्मिती प्रकल्प

रासायनिक खतांमुळे नापीक झालेली जमीन पुन्हा सुपीक होणार

पुणे – लोणची, पापड बनवणाऱ्या बचत गटामार्फत ग्रामीण भागातील महिला आता सोनखत निर्मिती करू लागल्या आहेत. खेड तालुक्‍यातील दोन महिला बचत गटांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या सहाय्याने हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यांनी इंद्रायणी फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेडने महासोनखत या प्रकल्पाची निर्मिती केली असून, त्यातून रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खेड तालुक्‍यातील आदिवासी भागातील मोरोशी येथील महिला बचत गटामार्फत सोनखत निर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पामुळे महिला बचत गटांना चांगल्या पद्धतीने उत्पन्न देखील मिळण्यास सुरुवात झाली असून, पहिली ऑर्डर देखील मिळाली आहे. सोनखताच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी जिल्हा नियोजन समितीने मंजुर केलेल्या निधीचा वापर केला जाणार आहे. या सोनखतामुळे नापीक होत चाललेली जमीन पुन्हा नव्याने सुपीक होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, राजगुरूनगर येथील संशोधन केंद्रात सोनखतासंदर्भात संशोधन देखील करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे शेती पिकांचा दर्जा देखील ढासळत असल्याने, उत्पन्नाचा विचार करून सोनखताच्या प्रकल्पाचा विचार करण्यात आला आहे. चांगल्या उत्पन्नासाठी सोनखताचा योग्य पर्याय उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

बचत गट आणि इतरांमध्ये समन्वय साधण्याचे काम आपला विभाग करत आहे. त्यांच्या मार्केटींगसाठी मदत केली जाणार आहे. तसेच शौचालयांची माहिती पुरवून त्यांना सोनखत तयार करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
– अमर माने, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)