बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती

यवतमाळ : आज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात बरोबरीने योगदान देत आहेत. त्यामुळे कधी काळी पुरुषप्रधान असलेला देश आता महिला प्रधान झाला आहे. ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांचे जाळे विणण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाकडे टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या संसाराला व आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लावला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वाहने उपलब्ध करीत स्वत:च वाहनाचे चालकत्व स्वीकारले आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, आजची ग्रामीण महिला जिद्द, परिश्रम आणि असामान्य कर्तृत्वाच्या माध्यमातून पुरुषप्रधान संस्कृतीवर मात करण्यात यशस्वी ठरली आहे. ही महिला क्षेत्रातील एक मोठी क्रांती आहे. चुलीपासून सुरू झालेला हा प्रवास आता व्यापार व्यवसायपर्यंत पोहोचला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या अनेक महिला क्रांतीच्या आदर्श आहे. महाराष्ट्रातील बचत गटाची चळवळ संपूर्ण देशात यशस्वी ठरली आहे. आज ग्रामीण महिला बँकेचे व्यवहार करतात. हे विकासाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)