बचत गटाची रक्‍कम लंपास

वडगाव मावळ – कामशेत व कान्हे येथून बचत गटाची रक्कम जमा करून दुचाकीवरून चाकण येथे निघालेल्या व्यक्तीचा अनोळखी इसमांनी दुचाकीवरून पाठलाग करून 44,615 रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवार (दि.30) दुपारी दोन वाजता पुणे- मुंबई महामार्गावर माळीनगर वडगाव (ता.मावळ) हद्दीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जितेंद्र माधव झुंजारे (वय 28, रा. कडाचीवाडी शिक्रापूर रोड, चाकण, ता. खेड) हे कामशेत व कान्हे येथून बचत गटाची रक्कम जमा करून दुचाकीवरून पुणे- मुंबई महामार्गावरून चाकण बाजूला निघाले होते. त्यांना लघुशंका आल्याने त्यांनी रक्कम व कागदपत्रे असलेली बॅग त्यांच्या दुचाकीला लावून लघुशंकेला गेले असता, त्यांच्या पाळतीवर असलेल्या दोन अनोळखी इसमांनी बॅग पळवली.

आरोपी त्यांच्या (एम एच 11 जी एन 313) दुचाकीवरून पाठलाग करून पाळत ठेवून होते फिर्यादी जितेंद्र झुंजारे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रल्हाद टेकाळे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)