बचत गटांच्या वतीने वृक्षारोपण

भोसरी – इंद्रायणीनगर येथील स्वामिनी माहिला बचत गट व यशस्वी महिला बचत गट यांच्या वतीने सेक्‍टर नं 2 मधील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक संजय वाबळे, स्वामिनी बचत गटाच्या अध्यक्षा वसुधा गायकवाड, आरती शेटल्लू, निलम कानवडे, कपिला कदम, मंजुश्री ऐवले, श्रध्दा शाह, सुनिता तोरवणे, विद्या पवार, रिना शाह, सीमा दरेकर तसेच यशस्वी बचत गटाच्या अध्यक्षा गायत्री बेलापूरकर, मंदाकिनी ढोबळे, आशा शेटल्लू, लता दरेकर, अनुराधा काटे, सारीका पोफळे आदी उपस्थित होत्या. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येक माणसाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. इंद्रायणीनगर परिसरात वृक्षारोपणासाठी निश्‍चित प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही नगरसेवक संजय वाबळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)