बचतीचे काही नवेमार्ग

मोबाईल ऑपरेटर कंपन्यांच्या स्पर्धेत व्हाईस कॉल, एसएमएस आणि डाटा दर कमी झाले आहेत.आपण वापरत असलेला प्लॅन स्वस्तातील आहे, हे आपण तपासले आहे ना? नसल्यास तो बदलून घ्या. आपण राहतो, तेथे नेटवर्क नसल्यास ऑपरेटर बदलणे आता खूप सोपे झाले आहे.

घरी वायफाय असल्यास किंवा मोफत वायफायउपलब्ध असतानाच डाऊनलोड किंवा अपडेट घेतले जातील, असे सेटिंग केले आहे ना?असे वायफाय आता गुगलने अनेक स्टेशनवर तर पुण्यात महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व प्रकारची बिले ऑनलाईन भरण्यास सुरवात केली आहे ना? विशेषत: इंटरनेट बॅंकिंग पद्धतीने अधिक चार्जेस लागत नाहीत. शिवाय त्याची नोंद आपल्या बॅंकेत एकाच ठिकाणी राहाते. पेटीएमने केल्यास कॅशबॅक मिळविता येतात.

रेल्वेच्या आयआरसीटीसी या वेबसाईटवर आरक्षित तिकिटे तर मिळतातच, पण ज्या गावाला जायचे आहे, तेथेरेल्वेचेस्वस्त अशी रीटायरिंग रूम्स आहेत. रेल्वे तिकीट असणाऱ्या प्रवाश्‍याला त्याचे ऑनलाईन बुकिंग करता येते. अशा 500 शहरांत रीटायरिंग रूम्स आहेत. त्यात राहिल्यास हॉटेलवरील खर्च वाचू शकतो.(ही वेबसाईट आता अधिक चांगली झाली आहे.)

आपणास फार घाई नसल्यास ओला किंवा उबर टॅक्‍सीची शेअर सेवा अतिशय किफायती दरात मिळू शकते.ती आपण वापरली आहे काय?

प्रवास करताना थोडे लवकर निघाल्यास रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकावर सिटी बस सेवेचा अतिशय स्वस्तातील पर्याय आपण निवडू शकतो.

स्वतंत्र रिक्षा केली तर अधिक बील होते, पण थोडी चौकशी केली तर शेअर रिक्षा अनेक ठिकाणी सुरु झाल्या आहेत, त्या अतिशय कमी दरात मुख्य रस्त्यावर उपलब्ध असतात. अर्थात, त्यासाठी थोडी चालण्याची तयारी हवी.

पुण्यासारख्या मोठ्या शहरात झुमकार आणि युलूसारख्या कंपन्यानी अतिशय स्वस्तात सायकल भाड्याने देण्यास सुरवात केली आहे. (अर्ध्या तासाला 3 रुपये) कमी अंतरासाठी आपण ही सायकल वापरू शकतो. त्यासाठी पेटीम ऍप तसेच त्या कंपन्यांचे ऍप आपल्याकडे हवेच आणि अर्थातच, इंटरनेट डाटा.

शहरात रविवारी मोठे भाजी, फळ बाजार भरतात, त्याठिकाणी स्वस्त आणि चांगली भाजी आणि फळे मिळतात.

फोन स्लो झाला म्हणून तो बदलण्याचा मोह होतो, तो नियमित साफ न केल्यास त्याचे स्टोरेज आणि मेमरी फुल होऊन तो स्लो होतो. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन तो साफ करण्याची सवय लावून घ्या किंवा त्यातील अत्यावश्‍यक फोटो, व्हिडीओ, ऑडीओ आणि मेसेसेज विशिष्ट दिवसांनी आपल्या डेस्कटॉपवर ट्रान्स्फर करून घ्या.

आपल्या घरात अजूनही जुन्या प्रकारचे दिवे असल्यास लीड दिवे घ्या, ज्यामुळे विजेचे बील कमी येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)