बचतगटाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक

खंडाळा- खंडाळा तालुक्‍यात महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील महालक्ष्मीनारायण बचत संघाच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत खंडाळा पोलिसांत लोहोम, ता. खंडाळा येथील बचत गटाच्या अध्यक्षा अरुणा अशोक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पुणे येथील महालक्ष्मीनारायण बचत संघाने अहिरे येथे खंडाळा तालुक्‍यातील लोहोम, अहिरे, म्हावशी, हरळी, शिवाजीनगर, पारगाव, अजनुज, भादवडे, वाण्याचीवाडी, घाटदरे, अंबारवाडी, मोर्वे या बारा गावातील सुमारे सातशे महिलांची मिटींग घेऊन बचत गट स्थापन करायला लावले. प्रत्येक महिलांचे दर महा 200 रुपये प्रमाणे रक्कम जमा करून ती बचत गटाकडे जमा करुन घेतली. त्याद्वारे महिला सक्षमीकरण व उद्योग उभारणी करण्याचे आश्वासन दिले. मात्र दरमहा पैसे जमा करून व महिलांच्या ठेव जमा करून त्या वर्षानंतर परत करण्याचे ठरले होते. मात्र मुदत संपूनही महिलांचे पैसे दिले नाहीत. यामध्ये लोहोम येथील बचत गटाची 46296 रुपयांची फसवणूक झाली आहे.

याबाबत दापोडी पुणे येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व मंदाराणी शिवाजी ढमढेरे या दांम्पत्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)