बघा ‘झिरो’ चित्रपटामधील सलमानचा देशी लूक

शाहरुख खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट ‘झिरो’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. केवळ २४ तासांच्या आतच या चित्रपटाच्या ट्रेलरला २ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शाहरुख खानच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

-Ads-

झिरो या चित्रपटात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. अनुष्का शर्मा एका दिव्यांगांची भूमिका साकारत आहे तर कतरिना कैफ ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत. तसेच या चित्रपटाच्या इश्कबाजी या गाण्यांमध्ये सलमान आणि शाहरुख देशी स्टाईलमध्ये जुगलबंदी करताना दिसणार आहे.

या गाण्यास शाहरुखने सोशल माध्यमांमध्ये शेयर करत खास मेसेज लिहिला आहे. ”अकेले चले थे इश्क के सफर पर, करने महबूब को राजी, दोस्त ऐसा मिला राह में,कर आए इश्कबाजी.’ तसेच ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले असून हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
4 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)