बगदादच्या पुर्व भागात भरवस्तीत बॉंबस्फोट ; 6 ठार

बगदाद – बगदादच्या पुर्वेकडील एका गजबजलेल्या भागात आज झालेल्या कार बॉंबस्फोटात किमान सहा जण ठार झाले तर अन्य अनेक जण जखमी झाले आहेत. या भागात जमीला घाऊक बाजार आहे. त्या गर्दीत स्फोटकांनी भरलेली कार घुसवून हा स्फोट घडवण्यात आला. हा शिया वस्तीचा भाग मानला जातो.

या स्फोटात किमान पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. तथापी शिया पंथीयांना लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आल्याचा कयास आहे. असे हल्ले इस्लामिक स्टेटकडून केले जातात त्यामुळे हा स्फोटही त्यांनी घडवला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. ताल अफार या इस्लामिक स्टेटच्या शेवटच्या अड्‌डावरील लष्कराची कारवाई अंतिम टप्प्यात आली असतानाच हा स्फोट घडवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)