बक्षीसपत्राच्या भूखंडावर पोटभाडेकरूंचा सुळसुळाट

संदीप राक्षे
सातारा:
सातारा शहराचा उत्तरेकड्‌चा भाग म्हणजे माजगावकर माळ. तब्बल 55 एकराचे क्षेत्र आहे. फार पूर्वी साताऱ्यात द. गो. माजगावकर ही फार मोठी आसामी साताऱ्यात रहावयास होती. त्यांच्या तीन पिढ्या सुद्धा साताऱ्यातच होत्या. येथील तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून आजच्या माजगावकर माळावरील सोळा एकर क्षेत्र लघुउद्योग क्षेत्राच्या विकसनासाठी नगरपालिकेला बक्षीसपत्र म्हणून देण्यात आले. मात्र आज माजगावकर माळावरची करंजे एमआयडीसी अनधिकृत पोटभाडेकरूंचे माहेरघर झाली आहे. तेहतीस वर्षापूर्वी मागेल त्याला भूखंड आणि जिल्हाधिकाऱ्यांना फक्‍त लेखी कळवून अहवालावर अनियमित पध्दतीने झालले जमिनींचे हस्तांतरण यामुळेच करंजे एमआयडीसीचा गुंता वाढत गेला. केवळ दोन चार मोठे व्यापारी वगळता एकूण वारलेल्या साठ भूखंडामध्ये दोन तृतीयांश भंगार मालाचे व्यापारी आहेत. परवाना प्राप्त जागेच्या चौपट जागा व्यापाऱ्यांनी शेड मारून बळकाविली आहे. त्यात भाडेकरू व पोटभाडेकरू यांच्यातच आर्थिक व्यवहार सुरू झाल्याने पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र पालिकेतले आणि राजकीय क्षेत्रातील काही झारीतले शुक्राचार्य आहेत ज्यांनी तडजोडीतच या महसूली दरोड्याचे गांभीर्य लपवून ठेवले. करंजे एमआयडीसीतल्या आर्थिक घोटाळ्यावर काही ‘सेटलमेंट दादा ‘ निपजले गेले. मोठ्या तोऱ्यात ते पालिकेत येऊन मुख्याधिकाऱ्यांशीच बोलू लागले. मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा कमरा बंद चर्चा सुरू ठेवल्याने संशयाचा धूर आणखीनच वाढला आहे. करंजे प्रकरणात बऱ्याच धादांत गोष्टी कागदोपत्री रंगवल्या गेल्या आहेत. भूखंड ताब्यात घेऊन त्याचे लिलाव करण्याचे आदेश असताना पालिकेने मात्र कुंभकर्णी पवित्रा घेतला आहे. इलेक्‍शन फंड द्या आणि कारवाईचे झेंगट वाचवा, काही लाखाचे लक्ष्मीदर्शन सत्ताधाऱ्यांना होत असल्याची वदंता असल्याने मूळ कारवाईचे घोडे अडून बसले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)