बकेट खरेदीला प्रशासनाचा “ब्रेक’

पाच वर्षांत 15 कोटींच्या 11 लाख बकेटचे वाटप

पुणे – महापालिकेच्या या वर्षाच्या अंदाजपत्रकातील तब्बल 5 कोटी रुपयांच्या बकेट खरेदीला महापालिका प्रशासनाने “ब्रेक’ लावला आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 15 कोटी रुपयांच्या सुमारे 11 लाख बकेट वाटप शहरात करण्यात आल्या आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रशासनाने थांबविली असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीत निधीतून दरवर्षी नगरसेवकांकडून सुमारे 2 ते 5 लाखांपर्यंत बकेट खरेदी केली जाते. त्यात कुटुंबांसाठी साडेसात लीटर तर सोसाट्यांसाठी सुमारे 80 लीटरच्या प्रत्येकी 2 बकेट दिल्या जातात. ही खरेदी दरवर्षी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून केली जाते. त्यानंतर या बकेट क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून वाटप केल्या जातात. यंदाही नगरसेवकांकडून सुमारे 5 कोटींच्या बकेटची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून नुकत्याच झालेल्या एस्टीमेंट कमिटीच्या बैठकीत या बकेटसाठींच्या दरांना मान्यताही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ही बकेट खरेदी केली जाणार होती. मात्र, महापालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षांत वाटप करण्यात आलेल्या बकेटचा आढावा घेतला होता. यात शहरात तब्बल 11 लाख बकेट वाटप गेल्या पाच वर्षांत केले असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात शहरात महापालिकेकडे नोंदणी असलेल्या सुमारे 7 लाख 20 हजार मिळकती आहेत. त्यात सुमारे 5 हजार मिळकती निवासी आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत प्रत्येक मिळकतीस सरासरी दोनवेळा कचरा बकेट वाटप करण्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेता यावर्षी पुन्हा बकेट द्यायच्या का याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत असल्याने ही बकेट खरेदी थांबविण्यात आली आहे.

बकेट खरेदी ठरली वादाचा विषय
महापालिकेच्या या बकेट वाटपाबाबत गेल्या काही वर्षांत अनेकदा वाद निर्माण झाले आहेत; तसेच बकेट वाटप होते की नाही इथपर्यंत प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. तर, काही वर्षांपूर्वी पालिकेच्या या नागरिकांसाठीच्या बकेट थेट अंदमान येथे विक्रीस असलेल्या निर्दशानास आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे हे बकेट वाटप नेहमीच चर्चेत राहिले आहे. तर आता प्रशासनाने संकलीत केलेल्या माहितीमध्ये तब्बल 11 लाख बकेट वाटप झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बकेट खरेदी पुन्हा वादाचा विषय ठरली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)