बकासुराच्या गावात उत्खनन : नागपूरजवळ सापडला किल्ला

नागपूर : महाभारतातील राक्षस असा उल्लेख असलेल्या बकासुराच्या गावात किल्ल्याचे अवशेष सापडले आहेत. हे गाव म्हणजे नागपूरपासून अवघ्या तासाभारावर असलेले केळझर हे आहे.

केळझर गावाच्या परिसरात एका डोंगरात पुरातन किल्ल्याचे अवशेष सापडले आहेत. मागीलवर्षी केळझर येथील डोंगरावर संशोधन करताना एका मंदिराचे भग्न शिखर सापडले. त्यामुळे नागपूर विद्यापीठाने पुरातत्व विभागाकडे या ठिकाणी उत्खननाची परवानगी मागितली होती. या उत्खननात त्यांना तोफगोळे, बाणांचे टोक, बहमनी नाणी मातीची भांडी, शिल्प आणि एक घोड्याचे जीवाश्मही सापडले आहे.

किल्ल्याला दोन बुरूज असून त्यांच्या दरम्यान पाण्याचे कालवे आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची व्यवस्था आहे. पुरातत्व संशोधन विभागाच्या विद्यार्थ्यांनी हा किल्ला शोधला आहे. त्या किल्ल्यांवर अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केल्याचे पुरावे समोर आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)