बकरी ईद उत्साहात साजरी

पिंपरी – राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बंधुभाव व शांतता नांदावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

निगडी येथील नुरानी मस्जिदमध्ये रशीद शेख, मुजीब शेख, लियाकत शेख, सय्यद पीर मोहम्मद, समद मुल्ला यांनी आयोजन केले. तर चिंचवड स्टेशन येथील जामीया गौसीया मस्जिदमध्ये ज्येष्ठ नेते आझम पानसरे, निहाल पानसरे, भाईजान काझी, माजी नगरसेवक अस्लम शेख यांनी नमाज अदा केली. अन्वर खान, झिशान सय्यद, हबीब शेख यांनी संयोजन केले. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात विविध ठिकाणी आजी-माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या नमाजीनंतर शुभेच्छा दिल्या.

चिंचवड स्टेशन येथील दवा बझार मधील अजुमन-शमा-ए-दिन येथे मौल्लाना सय्यद मोहसीन यांनी नमाज पढविला. काळेवाडीतील कोकणे नगर येथे मदरसा सिरातुल निजाद येथे मौलाना फिरोज यांनी नमाज पढविला. यावेळी हाजी जलील मुजावर, सयाजी पटेल, गुलाम शेख, हाजी ख्वाजाभाई कुरेशी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

निगडी येथील ट्रान्सपोर्टनगर मस्जिद, फातेमा मस्जिद (ओटा स्कीम), कस्तुरी मार्केट, चिखली रोड येथील शमशुल उलम मस्जिद, आकुर्डी येथील मदीना व अक्‍सा मस्जिद, नूर ए-ईलाही जमात, चिंचवडगाव, गांधीपेठ येथील आलमगीर शाही मस्जिद, वाल्हेकरवाडी येथील मदरसा-ए-जामीया ट्रस्ट चिंचवडेनगर येथील हुसेनी अरबी मदरसा, लिंकरोड, पत्राशेड काळेवाडी, रहाटणी, सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, मोरवाडी, खराळवाडी, नेहरुनगर, लांडेवाडी, भोसरी, घरकुल (चिखली) येथील मस्जिद व मदरसामध्ये मौलानांनी नमाज पढवला. बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी गोरगरीब तसेच नातेवाईक, मित्रांच्या घरी जाऊन कुर्बानीचा प्रसाद दिला. महिला व मुलींनी घरोघरी ईदची नमाज अदा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)