बऊर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला म्हस्के यांची बिनविरोध निवड

पवनानगर – बऊर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला बाळासाहेब म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच शिल्पा दाभाडे यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्‍त जागेवर उर्मिला म्हस्के यांची निवड करण्यात आली.

या वेळी उपसरपंच बाळासहेब मोहोळ, भरत कंक, शिल्पा दाभाडे, सिताबाई पांडे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाळासाहेब म्हस्के, राजाराम म्हस्के, संतोष म्हस्के, गणेश वाळुंजकर, नंदु म्हस्के, सुभाष म्हस्के, सतीश वाळुंजकर, मारूती म्हस्के, विष्णु वाळुंजकर, विजय दळवी, पप्पु दाभाडे, लहु म्हस्के, नितीन म्हस्के, नामदेव म्हस्के, प्रकाश कंक, दत्तु दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)