बंधुताच शोषणमुक्‍त भारत निर्माण करु शकते – डॉ. सबनीस

पिंपरी – स्वातंत्र्य व समता या दोन तत्वांना अतिमहत्त्व देऊन राज्यकारभार करुन प्रबोधनही याच मार्गाने केले जाते. बंधुताच शोषणमुक्त भारत निर्माण करु शकते. अर्थात भारतीय समाजाला सम्यक क्रांतीची गरज आहे. परंतु, सर्वांमध्ये बंधुभाव असल्याशिवाय हे शक्‍य होणार नाही, असे मत 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि भगवान महावीर शिक्षण संस्था भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रितम प्रकाश महाविद्यालयात 20 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रकाश पगारिया व्याख्यानमाला आयोजित केली होती. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस होते. यावेळी, ऍड. भास्करराव आव्हाड, प्रकाश रोकडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, डॉ. अशोककुमार पगारिया, हाजी अफझल शेख, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, डॉ. अश्‍विनी धोंगडे, महेंद्र भारती, चंद्रकांत वानखेडे, मधुश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके, शिवाजी शिर्के, हरिश्‍चंद्र गडसिंग आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. सबनीस म्हणाले, समाजातील बंधुतेचे मारेकरी सर्व जाती धर्माचे लोक असल्याने समाजातील बंधुभावनेला मोडीत काढण्याचे पाप केले जात आहे. भारतीय लोकशाहीच्या गाभ्याचे अधिष्ठान स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या सूत्रावर आधारित असूनही त्यांना मूल्यात्मक पातळीवर समानतेत का स्विकारले, असा प्रश्‍न उपस्थित होतो. सध्या अनुयायांनी स्वार्थासाठी राष्ट्रपुरुष व महात्म्यांना जाती-धर्माच्या चौकटीत अडकून ठेवले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली.

ऍड. आव्हाड म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यावेळचे राज्यकर्ते आणि सध्याचे राज्यकर्ते यात खूप मोठा फरक आहे. त्या काळातील राज्यकर्ते आपल्या संसाराची होळी करून देशाचा विचार करायचे. आज याउलट परिस्थिती झाली आहे. देशाची होळी करून स्वत:चा संसार फुलवणारांना आपण नमस्कार करतो.

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषण पुस्तकाचे प्रकाशन, डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या बंधुताचार्याची प्रकाशगाथा ग्रंथाचे प्रकाशन, बंधुताचार्य प्रकाश रोकडे संपादित अग्निकुंड समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन, मूल्याविष्कार या संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन, पवनेचा प्रवाह साप्ताहिक विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)