बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको

रावणगांव- खडकी व स्वामी-चिंचोली (ता. दौंड) परिसरातील ओढे-नाले आटले असल्याने ते पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत यात पाणी सोडावे, या मागणीसाठी बुधवारी (दि. 28) खडकीत पुणे-सोलापूर हाय-वे वर सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले आहे. खडकी व स्वामी-चिंचोली परिसरातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत, तसेच तेथील पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे. येथील नलिकांना खडकवासलाच्या वितरिका क्रमांक 32 ते 35 मधून ओढ्यात आणि बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
105 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
2 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
57 :blush: Great
2 :cry: Sad
5 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)