बंधन बॅंकेच्या शेअरची शेअरबाजारावर यशस्वी नोंदणी

      पहिल्याच दिवशी बॅंकेच्या शेअरच्या भावात झाली तब्बल 27 टक्‍के वाढ

मुंबई  -बंधन बॅंकेचे शेअर मंगळवारी शेअरबाजारावर नोंदले गेले तेव्हा शेअरच्या किमती 32.90 टक्‍क्‍यापर्यंत वाढल्या होत्या. दिवसभर बाजारात या शेअरची चर्चा चालू होती. गेल्या आठवड्यात बाजारात वातावरण मंद असूनही या बॅंकेच्या आयपीओला 14.62 पट जास्त प्रतिसाद मिळाला होता. मात्र याच काळात एका खासगी कंपनीला आणि एका सरकारी कंपनीला खरेदीदार मिळविणे अवघड झाले होते. शेवटी बंधन बॅंकेचा शेअर 27.25 टक्‍क्‍यांनी वाढून 477 रुपयांवर बंद झाला.

मंगळवारी दिवसभरात मुंबई शेअर बाजारात बॅंकेच्या 139 लाख शेअरचे तर राष्ट्रीय शेअर बाजारात 9 कोटी शेअरचे व्यवहार झाले. आता या बॅंकेचे बाजार मुल्य 56920 कोटी रुपयावर गेले आहे. आयपीओचा किंमत पट्टा 370 ते 375 रुपये होता. यातून बॅंकेला 4473 कोटी रुपये अपेक्षित होते. आता बॅंक विस्तारीकरणावर भर देणार आहे. गरीब महिलांना कर्ज देण्याबाबत बॅंक प्रसिद्ध आहे.

दरम्यान, चीन आणि अमेरिकेत संतुलित व्यापारासाठी अनौपचारिक पातळीवर चर्चा सुरू झाल्यामुळे कालपासून जागतिक बाजारात उमेदीचे वातावरण आहे. त्यामुळे सोमवारी भारतीय शेअर निर्देशांक वाढले होते. केंद्र सरकारने ठरविल्यापेक्षा कमी कर्ज घणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर महागाई निर्देशांकाशी संलग्न रोखे जारी करणार असल्याचे सांगितल्यामुळे बाजारात आणखी आशादायक वातावरण निर्माण झाल्यामुळे आज मंगळवारीही शेअर निर्देशांक वाढले.

मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 107 अंकानी वाढून 33174 अंकावर बंद झाला तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीही 53 अंकानी वाढून 10184 अंकावर बंद झाला. काल सेन्सेक्‍स 470 अंकांनी वाढला होता. एकूण वातावरण सकारात्मक झाल्यानंतर आतापर्यंत सपाटून मार खाल्लेल्या बॅंकाचे शेअर कालच्या प्रमाणे आजही वाढले आहेत. रुपयाचे मूल्य वाढून आता एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर गेल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळत असल्याचे दिसून येत आहे.

अर्थसंकल्पात सरकारने पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात 3.72 लाख कोटीचे कर्ज घेणार असल्याचे सांगीतले होते. मात्र काल अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या माहितीत पहिल्या सहा महिन्यात केवळ 2.88 लाख कोटी रुपयाचे कर्ज सरकार घेणार आहे. तूटीची ओकडेवारीही बुधवारी जाहीर होणार आहे. याबाबात गुंतवणूकदार आशावादी झाले असल्याचे दिसून येत आहे. धातू, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, तेल व नैसर्गिक वायू आणि आरोग्य क्षेत्रासह सर्वच क्षेत्राचे निर्देशांक वाढले आहेत. काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 2017 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केल्यामुळे निर्देशांक वाढले होते. परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 741 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जागतीक बाजारातील निर्देशांकही आज सकाळपासून वाढले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)