बंधनाचं मोल काय असतं, तेही पहावं…

  संस्कार

अरुण गोखले

एकदा एक शिष्य आपल्या गुरूंकडे आला, आणि त्यांना म्हणाला गुरूजी! तुम्ही नेहमी आम्हाला सांगत आला आहात की माणसाने त्याच्या जीवनात ध्येयाची कितीही मोठी उंची गाठली तरी त्याने नितीमूल्य आणि संस्कार विसरता कामा नयेत, होय ना?
अर्थातच.. गुरूजी एका निश्‍चयात्मक भावानी म्हणाले.
त्यावर तो म्हणाला,पण मला असं वाटत की एका निश्‍चित अशा ध्येयावर पोह्चल्या नंतर, जे हवं ते प्राप्त झाल्यानंतर ही नितीमूल्यांची, संस्काराची बंधने कशाला हवीत? त्याचा तो प्रश्‍न ऐकला आणि गुरूजी म्हणाले, तू असं कर तू उद्या ये. आपण उद्या बोलूया.
दुसरे दिवशी ठरल्यावेळी तो शिष्य पुन्हा गुरूंकडे आला. त्याला त्याच्या प्रश्‍नाचे उतर हवे होते. पण तो जेव्हा आश्रमात आला तेव्हा तर गुरूजी एका शिष्या सोबत पतंग उडवीत होते. त्याला आलेला पाहून गुरुजींनी शिष्याला त्याच्या हातातला पतंग त्या आलेल्या शिष्याच्या हातात द्यायला सांगितले.
आता गुरूजी आणि तो शिष्य दोघे पतंग उडवू लागले. हा हा म्हणता दोघांचेही पतंग चांगलेच उंच गेले. आपला पतंग हा गुरूजींच्या हातातील पतंगाप्रेक्षा थोडा अधिक उंच आहे हे पाहून तो शिष्य म्हणाला. पहा पाहा गुरूजी! माझा पतंग तुमच्या पतंगापेक्षा हवेवर अधिक उंच गेला आहे.
अच्छा म्हणजे तुझा पतंग हा हवेवर उंच गेला आहे नाही का? म्हणजे तुझ्या हातातल्या दोऱ्याची आता त्याला काहीच गरज नाही, असंच तुला म्हणायच आहे ना?
नाही म्हणजे अगदिच तसं नाही म्हणायच. कारण थोड्या उंचीवर जाण्यासाठी ह्या दोऱ्याची त्याला मदत झाली हे खरं आहे. पण आता एका ठराविक उंचीवर गेल्यावर त्याला उगाच दोरीच बंधन कशाला?
त्या गुरू शिष्यांच ते बोलण चालू असताना गुरूजींनी आपला पतंग कधी त्याच्या पतंगाच्या जवळ नेला आणि पेच घालून त्यांनी कधी त्याचा पतंग काटला ते त्याला कळलच नाही.
गुरूजींच्या हातात ज्याची दोरी होती तो पतंग मात्र अजूनही जस जसा ढील द्यावा तस तसा तो वर वर जात होता.
गुरूजींची ती बोलकी कृती त्याला हे शिकवून गेली की मिळवळेल्या उंचीवर टिकून राहण्यासाठी संस्कारांची निती मूल्यांची बंधने ही आवश्‍यकच असतात, ती प्रगतीची अडसर नसतात, तर ती उन्नतीला प्रेरक असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)