बंद साखर कारखान्यांबाबत सहकारमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

मुंबई : राज्यातील बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. विधानपरिषदेत साखर कारखान्यांसमोरील अडचणी आणि ऊस उत्पादकांसमोरील प्रश्नांवर करण्यात आलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांमागे शासन खंबीरपणे उभे राहील, तसेच साखर कारखानदारी अडचणीत येणार नाहीत यासाठी प्रयत्न करण्यात येतील, देशमुख यावेळी म्हणाले.

ग्राहकांच्या साखरेचा दर आणि उत्पादकांच्या साखरेचा दर वेगळा ठेवण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने वेगवेगळा दर कसा ठरवावा, याबाबतच्या उपायांचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास केंद्र सरकारने सांगितले असल्याचे त्यांनी वेगवेगळ्या दराने साखरेची विक्री करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि कारखाने टिकले पाहिजेत. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)