बंद सदनिका फोडून साडेपाच लाखाची चोरी

पुणे – बंद घर फोडून 5 लाख 41 हजाराची घरफोडी करण्यात आली. ही घटना टिंगनेनगर येथे रविवारी घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पांडुरंग बर्वे (71, रा. टिंगणेनगर) मोरया गार्डनसमोर विधाता नावाच्या बंगल्यात रहातात.

चोरट्यांनी त्याच्या घराचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. यानंतर बेडरुमच्या कपाटातील रोख 71 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 41 हजार किंमतीचा ऐवज घरफोडी करून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)