बंद मध्ये सहभागी न होण्याचे आठवले यांचे आवाहन

नवी दिल्ली – दलित संघटनांनी आज 9 ऑगस्ट रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. ऍट्रॉसिटी कायद्याच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच दिलेल्या निर्णयाच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे तथापी या बंद मध्ये लोकांनी सहभागी होऊ नये असे आवाहन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

या संबंधात जारी केलेल्या निवेदनात त्यांनी असे आवाहन केले आहे की लोकांनी समाजात बंधुभाव सलोखा आणि शांतता कायम राखली पाहिजे. त्यांनी म्हटले आहे की संसदेत अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश रद्दबातल ठरवला आहे. तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे विधेयकही संमत झाले असून ही दोनही विधेयके म्हणजे दलित व मागासांच्या हितासाठी टाकण्यात आलेले क्रांतीकारी पाऊल आहे.

तथापी विरोधक या प्रकरणात सरकारला बदनाम करण्याचे काम करीत आहेत.पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागासांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काम करीत आहे असेही त्यांनी यात नमूद केले आहे.

ऑल इंडिया आंबेडकर महासभेच्या नेतृत्वाखाली सर्व दलित संघटनांनी भारत बंदचे आयोजन केले आहे, त्या अनुषंगाने आठवले यांनी हे निवेदन जारी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)