बंद प्लॅट फोडून 11 तोळे दागिने लंपास

कोरेगावमूळ येथील घटना : 25 हजार रोकडचा समावेश

लोणी काळभोर- घरात कोणीही नाही यांचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 11 तोळे सोन्याचे दागिन्यांसह 25 हजार रुपये रोख, असा एकूण 2 लाख 45 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना कोरेगांवमूळ (ता. हवेली) येथे घडली आहे. याप्रकरणी पंकज सुभाष येलमागे (वय 37, रा. प्रयागधाम हॉस्पिटल, बिल्डिंग नंबर 8 रुम क्रमांक 24, ता. हवेली. मूळ रा. देवठाण, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज येलमागे यांचे वडील सुभाष व आई मंजुळा हे दोघे कोरेगावमुळ ग्रामपंचायत हद्दीतील बोधेवस्ती येथे असलेल्या आनंदवास्तु अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 202 मध्ये रहातात. त्यांची आई दि. 3 फेब्रुवारी रोजी देवदर्शनासाठी चाळीसगांव येथे गेली. त्यामुळे दुपारनंतर फ्लॅटला कुलूप लावून पंकज हे वडिलांना आपल्या समवेत घरी घेऊन गेले. दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंकज घरी असताना त्यांना आईवडील रहात असलेल्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची माहिती फोनवरून कळाली. ते तात्काळ आनंदवास्तु अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्यांना बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटाचे दरवाजे उघडे व घरातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरफोडी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी आपल्या आईला ही घटना कळवली. त्यावेळी आईने त्यांना लाकडी कपाटाचे ड्रॉव्हरमध्ये रोख रक्‍कम व सोन्याचे दागिने ठेवले आहेत, अशी माहिती दिली. तिच्याशी चर्चा करून पंकज येलमागे यांनी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कोयंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटातली ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले 40 हजार रुपये किमतीची 2 तोळ्याची मोहनमाळ, 80 हजार रुपये किमतीचे प्रत्येकी 2 तोळ्याचे 2 मोठी मंगळसूत्र, 40 हजार रुपये किमतीची प्रत्येकी 1 तोळ्याचे 2 लहान मंगळसूत्र, 20 हजार रुपये किमतीचे 1 तोळ्याचे कानातील 2 जोड, 40 हजार रुपये किमतीच्या 2 तोळ्याच्या 4 बांगड्या असा एकूण 11 तोळ्याचे दागिने व 25 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 45 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)