बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने बसवलेल्या 430 कॅमेरापैकी 40 कॅमेरे नादुरुस्त

पिंपरी – गेल्या काही वर्षांपासून शहरवासियांच्या सुरक्षितेच्या दृष्टिने मुख्य चौक, रस्त्यावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी देखभाल दुरुस्तीअभावी बंद झाले आहेत. पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे महापालिकेने शहरात बसविलेल्या 430 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी 40 कॅमेरे “ऑफ’ आहेत. आता विविध कारणामुळे बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या महापालिाका प्रशासन आणि पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. बंद पडलेल्या या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांपर्यंत पोहचणेही पोलिसांसाठी अडचणीचे ठरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहराचे नागरीकरण झपाट्‌याने वाढत आहे. औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या शहरात राज्यातून आणि परराज्यातूनही अनेकजण उदरनिर्वाहासाठी शहरात दाखल होत असतात. त्यामुळे शहराच्या विस्ताराबरोबरच शहराची सुरक्षा आणि गुन्हेगारीकरण रोखण्याचे आव्हान प्रशासनसमोर असते. ही बाब लक्षात घेवून महापालिकेलेने शहरातील संवेदनशील भागात आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यापैकी पिंपरी मंडई भागात 20, चिंचवड परिसरात 32, रावेतमध्ये 27, भोसरीमध्ये 17, मोशीमध्ये 9, यमुना नगर पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये 27, साने चौक पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये 8, दापोडीमध्ये 11, सांगवी 20, पिंपळे गुरव 19, यासह महापालिका इमारत, वर्कशॉप आणि महापालिकेची रुग्णालये अशा प्रमुख मिळकतींवर 430 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत.

मात्र, मागच्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अवस्था खिळखिळी झाली आहे. काही कॅमेरे बंद पडलेले आहेत, तर खाली वाकलेले आहेत. त्यामुळे या कॅमेराचा उपयोगच होत नसल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी चित्रीकरण पाहण्यासाठी असलेल्या स्क्रीन खराब झाल्या आहेत. त्यामुळे कॅमेरातील हालचालीच टिपता येणे कठीण झाले आहेत. त्यामुळे असे कॅमेरे असून अडचण नसून खोळंबाच बनलेले आहेत. आजघडीलाही महापालिकेने बसवलेल्या कॅमेरापैकी 40 कॅमेरे बंद आहेत. त्याची दुरुस्तीही रखडलेली आहे. विशेष म्हणजे सतत कोणत्याना कोणत्या कारणाने 35 ते 40 कॅमेरे बंद अवस्थेतच असल्याने अशा कॅमेराचा उपयोगच होत नाही.

कॅमेरा उभारणीनंतर ती ऑपरेट करण्यासाठी यंत्रणाही अपेक्षित सक्षम नसल्याचे दिसते, त्यामुळे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्‍त होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी सध्या स्मार्ट सिटी योजनेतून प्रयत्न सुरू आहेत. सध्या चिंचवड मधील चापेकर चौक, गांधी पेठ, अहिंसा चौक, बिजलीनगर मार्ग, पुणे-मुंबई महामार्गावरील चौकामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत आहे. मात्र इतर भागात यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. सध्या विविध भागात महापालिकेने बसवलेल्या सीसीटीव्हीचे कंट्रोल रुम पुणे आयुक्त कार्यालयाशी जोडलेले आहे. त्यामुळे सध्या तरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखरेख पुणे पोलिसांकडूनच होत आहे. मात्र, आता आयुक्त कार्यालय झाल्यानंतर लवकरच पिंपरी येथील आयुक्त कार्यालयात कंट्रोल रुम सुरु होणार आहे. मात्र आजही याकडे दुर्लक्ष असल्याचे पाहवयास मिळत आहे.

उपनगरांमधून सीसीटीव्हीची मागणी
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या विविध भागात कॅमेरे बसवण्यात आले असले तरी नागरिकांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी होत असते. पोलीस प्रशासनाकडूनही संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसवण्याबाबत महापालिकेला सांगण्यात येते. त्यामुळे, आजही अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची गरज आहे. स्मार्ट सिटी योजनेतून आणखी कॅमेरे बसवण्यात येणार असल्याने पुढील काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा
महापालिकेने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मोक्‍याच्या वेळी अनेकदा बंद असल्याचे दिसून येते. तर काही कॅमेरे चालू असले तरी त्यांची चित्रित करण्याची क्षमता कमी असल्याने स्पष्ट दिसतच नाही. अशा वेळी मात्र चालू असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही असून अडचण नसून खोळंबाच बनतात. काही गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना असाच अनुभव आल्याने पोलिसांनाही अशा उपयोग नसलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या बाबातीत मन:स्ताप सहन करावा लागत आहे. A

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)